या लढतीकडे नगर शहराचे लक्ष लागणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादीचे कै. माजी नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांना भाजपने प्रभाग क्र.12 मधून उमेदवारी दिली आहे. अर्थात गिरवले या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. परंतू त्यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपची उमेदवारी स्वीकारली आहे. 

त्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्‍का बसला आहे. विशेष म्हणजे निर्मला गिरवले यांची लढत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्याबरोबर होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे शहराचे लक्ष लागणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.