वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक हे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुमो गाडीचा चुराडा झालाय. 

धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी सातेफळ इथं अवैध रेतीचा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता सरळ तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत अभिजित नाईक जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीय सुरू आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.