पेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी एसयूव्ही कार लॉन्च !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. या कार पहिल्यांदा जिनेव्हा मोटर शोमध्ये सर्वांना दिसली. ह्युंदाई कोना कंपनीची ही एसयूव्ही कार पहिल्यांदा भारतात लॉन्च होणार आहे. 
Loading...

या आधी या कारची झलक ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये पाहायला मिळाली होती. ही कार २०१९ मध्ये लॉन्च होईल असं म्हटलं जात आहे.ह्युंदाई कोना एसयूव्ही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जात आहे. या कारच्या इलेक्ट्रिक मोटारची पावर १३१ बीएसची आहे. हे इंजीन न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं.

कंपनीने दावा केली आहे की, फूल चार्ज केल्यावर ही गाडी ३०० माईल्स म्हणजेच ४८२ किमी पर्यंत चालते. या कारची किंमत अजून अधिकृतरित्या समजली नसली, तरी भारतीय बाजारात ही कार १३ ते १८ लाखाच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.