सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात गुन्हे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुकडीचे पाण्यासाठी राशिन येथे सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व बेकायदेशीरपणे रस्ता रोको केला म्हणून पोलिसांनी सुमारे ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाजपचे युवानेते राजेद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते माजी सरंपच श्याम कानगुडे यांचा समावेश आहे. 


Loading...
मनोज शिवाजी लातुरकर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ नोव्हेबर रोजी दुपारी राशिन गावातील करमाळा चौकामध्ये कुकडीचे पाणी राशिन परिसरातील चिलवडी चारीला सोडण्यात यावे. परिसरातरील सर्व बंधारे भरून द्यावेत या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी सरकार आणि मंत्र्यांविरोधात भाषणे केली, घोषणाबाजी केली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, मालोजी भिताडे,संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम,जेष्ठ नेते मारूती कानगुडे, शिवराज शेटे, भरत नवले, युवराज हाके, सिचन बर्डे या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेशामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.