निष्ठावंतांना डावलल्याने भाजपा नेत्यांची डोकेदुखी वाढणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकीत सर्वच आघाड्यावर तयारीत असलेल्या भाजपची उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी दुसरी 33 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर करतांना स्थानिक नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. एवढे करूनही या यादीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने पक्षाची डोकेदुखी आता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
Loading...

या यादीत नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील जुने व निष्ठवंतांना बाजूला करण्यात आल्याने निवडणुकीत बंडखोरीची शक्‍यता वाढली आहे. या यादीत रिपाईंच्या गटाचा विचार करण्यात आल्या असून काही जागा त्यांना देण्यात आल्या आहेत.


पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत माजी नगरसेवकांची पत्नी, बहिण, यासह नव्याने पक्षात आलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.