पतंग काढण्यासाठी विजेच्या खांबावर गेलेल्या मुलाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढण्याकरिता वर चढलेल्या शालेय विद्यार्थ्याचा विजेचा झटका बसून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साकुरी शिवारात घडली. 


Loading...
गमे हॉस्पिटलशेजारील सुरेंद्र सांड यांच्या मोकळ्या जागेत कृष्णा वाल्मिक जगताप (११ वर्षे, गिरमेवस्ती, साकुरी) खेळत होता. त्याला या परिसरातील विजेच्या खाबांच्या मेनलाईनजवळ पतंग अडकलेला दिसला. पतंग काढण्याकरिता तो खांबावर चढला असता विजेचा झटका बसून जमिनीवर फेकला गेला. 

त्याला दवाखान्यात नेले असता तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कैलास पांडुरंग गिरमे (गिरमेवस्ती) यांनी राहाता पोलिसांना ही खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास फौजदार टी. एस. वाघमारे करत आहेत. कृष्णा इयत्ता सहावीमध्ये संत गाडगेबाबा आश्रमात (लोहारा कसारा) शिकत होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.