तडीपारीच्या संकटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी आधीपासूनच सावध असलेल्या पोलिसांनी महापालिकेच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत पोलिसांनी पुन्हा तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे. सुनावणीनंतर तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधितांना १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याबाहेर राहावे लागणार आहे. 
Loading...

एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने राजकीय व्यक्तिंविरोधात तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. या कार्यवाहीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

केडगाव हत्याकांड, पोलिसांवर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे ९०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अनेकांविरोधात आता तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. प्रत्येकजण वकिलांचे उंबरठे झिजवत आहेत. तडीपारीची कार्यवाही झाली तर अनेकांना जिल्ह्याबाहेर राहूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणर आहे. 
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.