मराठा आरक्षणास ओबीसी संघटनांचा विरोध !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाचा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी तीव्र विरोध केलाय. मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला विरोध करताना ओबीसी संघटनांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरही शंका उपस्थित केलीय. 
Loading...

मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंसवैधानिक असून, या अहवालाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्नित असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय. मराठा समाजाला आरक्षण बहाल करण्याआधी जाती निहाय जनगणना करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी सरकारकडे केली आहे. 


ओबीसी संघटनांकडून मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून आक्षेप नोंदवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र धाडण्यात येणार असल्याचं ओबीसी संघटनांनी जाहीर केलंय. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकार्त्यांनाही देण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आलीय.बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.