ही वेळ लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त दहेगाव मंडळाच्या दौऱ्यावर लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाऊन तेथील जायकवाडीला जाणाऱ्या पाण्याच्या विरोधात जमलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. वहाडणे म्हणाले, निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे तालुक्याची ही दुष्काळग्रस्त अवस्था झाली आहे. 
Loading...

२००५ सालाच्या समन्यायी पाणीवाटपाचा करार झाला आणि या तालुक्यावर पाण्याचे संकट ओढवले. पाणी समोर असून देखील वापरता येत नाही हे एक मोठे दुःख आहे. ज्या प्रमाणे नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे शासनासोबत भांडल्या त्या प्रमाणे येथील लोकप्रतिनिधी भांडले असते, तर आपले पाणी जायकवाडीला गेले नसते. पण मंत्रिपदाच्या लालसेपोटी ते राहूनच गेले. 

दुष्काळग्रस्त दौऱ्यावरून आल्या आल्या वहाडणे यांनी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे व तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनावर वहाडणे, प्रा. सुभाषचंद्र शिंदे, विनित वाडेकर, संजय कांबळे, सुभाष दवंगे, चेतन खुबाणी, वसंत जाधव, विनायक गायकवाड, राजेंद्र खैरे, सैदूबाबा शेख, सुधाकर गाढवे, समीर आंभोरे, विवेक कुलकर्णी, रमेश नागरे आदिंच्या सह्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.