बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माझ्या विरुध्द शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा राजेंद्र जगताप यांनी केला असुन काही स्थानिक ग्रामस्थांनी संबंधीत महिला भगिनींचा गैरसमज करुन देवुन शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन माझी नाहक बदनामी केली आहे. 
Loading...

सोशल मिडीयावर बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.राजेंद्र जगताप यांनी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा साईपालखी सोहळ्या दरम्यान विनयभंग केल्या प्रकरणी शिर्डी पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निलंबनाची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून संस्थान प्रशासनाने त्यांच्याकडून मंदिर प्रमुखांचा पदभार काढून घेतला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.