पाटबंधारे विभागाच्या गोदामास आग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी खुर्द येथील पाटबंधारे विभागाच्या गोदामास आज दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान प्रचंड आग लागून गोदामातील ४० ते ५० वर्षा पूर्वीचे संपूर्ण रेकोर्ड जळून खाक झाले आहे. तसेच गोदामातील वापर नसलेले लाकडी फर्निचरही आगीत जळाले. 

Loading...
राहुरी,देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनेच्या ठिकाणी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी रात्री उशिरापर्यंत आगीची धग कायम होती.. 

विवार सुट्टीचा दिवस असला तरी मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी वांबोरी चारीचे पाणी मिरी परिसरात सुरु असल्याने त्या ठिकाणी कार्यरत होते. मुळा पाटबंधारे विभागाच्या राहुरी खुर्द येथील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामातून धूर येत असल्याचे कार्यालयातील शिपाई ऑपरेटर आर. एस. जमदडे यास समजले

आग कशी लागली हे निश्चित सांगता येत नाही. या गोदामात कालबाह्य झालेली अनेक वर्षाची जुनी कागदपत्रे तसेच कालबाह्य झालेले जुने फर्नीचर, लाकडी रॅक होत्या. याबाबत चौकशी करण्यात येईल. खेडकर यांनी घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

राहुरी नगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील विलास गडाख, राजेंद्र पवार, नंदू मोरे, रविंद्र गाडेकर, बाळू पवार, बबन गाडे, देवलाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक पथकातील कर्मचारी सुरेश दुस, मंजाबापू बर्डे, मुकेश डांगे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.