भावी नगरसेवक पोलिस ठाण्यात.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी भावी नगरसेवकांना सध्या पोलिस अधीक्षकांसह पोलिस ठाण्याचे उंबरडे झिजवावे लागत आहे. पोलिसांकडून शुद्ध चारित्र्याचा दाखला मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. इतर वेळी पोलिस अधीक्षक कार्यालयात चारित्र्य पडताळणीचा दाखल घेण्यासाठी किरकोळ वर्दळ असते. परंतू महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हे दाखल घेण्यासाठी सध्या मोठी गर्दी होत आहे. 
Loading...

अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस उरल्याने इच्छुकांची दाखल घेण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. महापालिका निवडणुकीसाठी आता केवळ दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याने इच्छुकांना दाखल घेण्यासाठी जोरदार धावपळ करावी लागणार आहे. 

मतदार व कार्यकर्त्यांच्या मागे धावणाऱ्या उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचा दाखल मिळविण्यासाठी पोलिस ठाण्याचे उंबरडे झिजवावे लागत आहे. चारित्र्य पडताळणीचा दाखल मिळविण्याची प्रकिया देखील ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांना कधी पोलीस ठाण्याकडे तर कधी पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा वाचक शाखेकडे धाव द्यावी लागत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.