मारहाणीप्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्‍यातील वडनेर हवेली येथील सौरभ साहेबराव वाळुंज यास म्हसणे-पारनेर रस्त्यावर पाच-सहा तरुणांनी काठ्या, तलवारीने मारहाण केली. या प्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी घडली. या प्रकरणी वाळुंज यांच्या तक्रारीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Loading...
सौरभ वाळुंज हा खासगी कंपनीत काम करतो. तो काम संपवून घरी वडनेर हवेलीला जात असताना म्हसणे फाट्यावरुन अज्ञात इसमाने लिफ्ट दिली. एक किलोमीटर पुढे जाताच माहून आलेल्या जीपमधील व्यक्तींनी शिवीगाळ करून त्यांना काठ्या व तलवारीने जबर मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. 

या प्रकरणी वाळुंज यांच्या फिर्यादीवरून माजी उपसरपंच राजीव दादाभाऊ सोनुळे, प्रताप भाऊसाहेब सोनुळे, बाळू गंगाराम सोनुळे, किरण भाऊसाहेब सोनुळे (चौघे रा. वडनेर हवेली, सध्या शिरूर) यांच्यासह चार अनोळखी इसमांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सध्या सुपा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी उशिरा चौघांवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.