सुजय विखेंचे राष्ट्रवादीपुढे लोटांगण, कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आघाडीत कॉंग्रेसला 22 जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या एका गटामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कॉंग्रेसकडून डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीशी आघाडीबाबत चर्चा केली. थोरात गट या चर्चेपासून दूर राहिला. जागा वाटपाची अधिकृत यादी अद्याप मिळाली नसल्याचे कॉंग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.
Loading...

दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीबाबत राष्ट्रवादीकडून आ. संग्राम जगताप व कॉंग्रेसकडून डॉ. सुजय विखे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय झाला. त्यानुसार राष्ट्रवादी 40 तर कॉंग्रेस 22 जागा लढवणार आहे. दोन्ही कॉंग्रेसकडून युनायटेड रिपब्लिकन पक्ष व कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येक तीन अशा सहा जागा देण्यात येणार आहेत.

आमदार संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आघाडीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘सावधगिरी‘ म्हणून सर्वच्या सर्व 68 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर कॉंग्रेसच्या 80 इच्छुकांची यादी प्रदेशला पाठविण्यात आली होती. 


रविवारी आघाडीचा अंतिम निर्णय झाला. राष्ट्रवादीला 45 तर कॉंग्रेसला 25 असे जागा वाटप झाले. त्यातील प्रत्येकी तीन जागा युनायटेड रिपब्लीकन व भाकपला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कॉंग्रेसने मागील निवडणुकीप्रमाणे 32 जागांची मागणी राष्ट्रवादीकडे केली होती. 

प्रदेश कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी निम्म्या जागा घेण्याची सूचना पदाधिकार्‍यांना केली होती. प्रत्यक्षात मात्र, कॉंग्रेसला 22 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस गोटात नाराजी उमटली आहे. उमेदवारी न मिळणारे कॉंग्रेसचे इच्छुक दुसर्‍या पक्षाचे दार ठोठावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.