मत विकत घेणार्‍यांच दिवाळ काढून, चारित्र्य संपन्न उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर वोट माफिया हद्दपार करुन, मतदारांमध्ये उन्नतचेतनेच्या जागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शहरातून ध्वज संचलन करण्यात आले. मतदारांच्या बोटाला शाई लाऊन मत विकत घेणार्‍यांच दिवाळ काढून त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याचे तर चारित्र्य समन्न उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. 
Loading...
 
लोकशाही पध्दतीने होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांत सर्व सुत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे. मात्र सुशिक्षित नागरिक भ्रष्ट उमेदवारांच्या मतविक्रीला बळू पडून आपले सत्व विकत आहे. मते खरेदी करणारे भ्रष्ट उमेदवार निवडून आल्यानंतर गुंडशाही असतित्वात येऊन मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही धोक्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

हुतात्मा स्मारक येथून निघालेल्या ध्वज संचलनाचे शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे समारोप झाला. यामध्ये अ‍ॅड.कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सुशांत म्हस्के, संजय अडागळे, सुनिल सकट, संतोष लोखंडे, बाबासाहेब भोसले, अशोक दिवटे, मंगेश गायकवाड, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, लिला रासने, अंबिका जाधव, फरिदा शेख, गौरी कुलकर्णी, शारदा गायकवाड आदिंसह नागरिक सहभागी झाले होते. 

नगरच्या अधोगतीला व विकासाला मतदार जबाबदार आहे. मत विकत घेऊन पैश्याच्या जीवावर निवडून आलेले उमेदवार सर्वसामान्यांची कामे करीत नाही. निवडून आल्यावर पैसा वसुल करण्यासाठी ते सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करतात. पैश्यातून सत्ता मिळवता येत असल्याचा चुकीचा पायंडा समाजात रुळत असून, हे थांबविण्यासाठी उन्नतचेतनेने मतदारांमध्ये जागृतीची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.