राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यातील किमान आणि कमाल तापमानात १ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. रविवारी (दि.१८) नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवार (दि. २०)पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Loading...

दक्षिण भारतातील 'गज' या चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. अरबी समुद्रात असलेल्या या प्रणालीमुळे पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील 'गज' वादळ निवळून शनिवारी अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्राकार वारे वाहत असून, सोमवारी या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.