महिला विनयभंग प्रकरणी जगतापांना निलंबित करा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिर्डी महिला विनयभंग प्रकरणी साईबाबा मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगताप यांना तत्काळ पदावरून हटवून निलंबनाची कारवाई करावी यासाठी शनिवारी काँग्रेसतर्फे मोर्चाने जाऊन संस्थान प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


Loading...
दरम्यान, साईबाबा संस्थानने मंदिर प्रमुख जगताप यांच्याकडील पदभार काढून घेतला आहे. त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करून आगामी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे संस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, राहात्याचे माजी नगराध्यक्ष कैलाश सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सुमन वाबळे, रजनी जोगळेकर, सुनीता तांबे आदींनी संस्थानचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे व उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे यांना याबाबत निवेदन दिले. 


जगताप यांच्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत कारवाई करण्यात आली नाही, तर साईबाबा मंदिरासमोर उपोषणाचा इशाराही या वेळी देण्यात आला. जगताप यांच्या निलंबनासंबंधी प्रस्ताव आगामी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.