गाजावाजा केल्यानेच पुतळे जाळण्याची वेळ ! तनपुरेंची आमदार कर्डिलेंवर टीका


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नऊ वर्षापासून पदावर बसलेल्यांनी वांबोरी चारीसाठी काय केले. सर्वसामान्यांप्रती संवेदनशील माणसे पदावर असती तर शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागले नसते. आघाडी सरकारच्या काळात कामे झाली पण गाजावाजा झाला नाही. केवळ गाजावाजा करण्याने पुतळे जाळण्याची वेळ येते, अशी टीका राहुरीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली. 
Loading...

तालुक्यातील सातवड येथील ग्रामस्थांनी वांबोरी चारीचे पाण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा पुतळा जाळला. सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. वांबोरी चारीचे पाणी मिळाल्याशिवाय आता माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यावेळी तनपुरे बोलत होते. पाणी पूर्णदाबाने व पूर्ण क्षमतेने मिळावे, ही मागणी आजही पूर्ण झाले नाही 


तनपुरे म्हणाले, वांबोरी चारीचे सर्व व्हॉल्व्ह एकाच वेळी चालतील, असा उल्लेख नियमावलीत आहे. अधिकारी-पदाधिकारी यांचा समन्वय नाही. या चारीसाठी अनेक पिढ्यांनी आंदोलने केली. अनेक वर्षानंतर चारीला पाणी येईल, असे वाटत असताना चारीला पाणी मिळावे म्हणून परत आंदोलने करावी लागतात. ही गोष्ट लोकप्रतिनिधी सर्व सत्ताधाऱ्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे, असाही अारोप तनपुरे यांनी केला. 
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.