मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास लावून संपवले जीवन .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  रागाच्या भरात मुलाने आत्महत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्याची खबर मिळताच मानसिक धक्का बसलेल्या आईने आपल्या घराच्या छताला गळफास लावून आपले जीवन संपवले. सदरची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.
Loading...

रवींद्र पवार (६४) हे बिचुकले तालुका कोरेगाव येथे आपली पत्नी हेमा, मुलगी प्रतीक्षा, मुलगे प्रतीक व शुभम यांच्यासह राहतात.शुभम हा देऊर येथे दहावीत शिकत असून तो दिवाळी सुट्टीला नांदवळ येथे आत्याकडे गेला होता. १७ रोजी शुभमला वडील रवींद्र पवार व भाऊ प्रतीक घरी आले होते. 


त्यानंतर काही तासानंतर तो दिसेनासा झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याबाहेरील असलेल्या चिंचेच्या झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत तो सापडला. त्याला वाठार येथील रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदरची बातमी शुभमच्या आई हेमा पवार यांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांनीही आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला व आपले जीवन संपवले.शुभमने व त्याच्या आईला आत्महत्या का करावी लागली?याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.