तडीपारीच्या कारवाईतून सुटका होण्यासाठी देव पाण्यात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात राडेबाजी करणाऱ्यांवर तडीपारीची आणि हद्दपाराची कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली आहे. शहर हद्दातील चार पोलीस ठाणे येतात. यात मुख्यत्वः कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि भिंगार पोलीस ठाण्याचा समावेश आहे. 
Loading...

दरम्यान, प्रस्तावाची पूर्ण छाननी करूनच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रातंधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली आहे. तडीपारीच्या प्रस्तावावरील काही सुनावण्या व निर्णय सोमवारी (ता. 12) होणार आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल झालेल्यांनी कारवाई होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले आहेत.

सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, श्रीपाद छिंदम, किशोर डागवाले, गणेश भोसले, शिवाजी कदम, संभाजी कदम, नंदू बोराटे, दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, बंटी सातपुते, अफजल शेख, हर्षवर्धन कोतकर, गजेंद्र दांगट, विकी जगताप, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, आसाराम कावरे, गणेश हुच्चे, अजय चितळे, सुनील कोतकर, बंटी राऊत, मयूर बोचूघोळ यांना तडीपारीच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत.


उर्वरीत सुनावण्या सोमवारी (ता. 19) होणार आहे. याच वेळी अर्ज भरण्याची उमेदवारांना घाईगडबड असणार आहे. त्यातच तडीपारीचा आदेश आल्यावर निवडणुकीवर परिणाम होईल, म्हणून तडीपारीच्या नोटिसा निघालेल्यांनी कारवाई होऊ नये म्हणून विनवण्या सुरू केल्या आहेत. 

काहींनी कारवाईतून सुटका होण्यासाठी देव पाण्यात घातले आहे. ज्योतिषाकडे धाव घेत, गुरूंचा सल्ला घेऊन मनोबल वाढविले आहे. परंतु कारवाईचा आदेश सोमवारी झाल्यावर तडीपारीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.