निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी तरुणाला तलवारीने मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील सौरभ साहेबराव वाळुंज याला पाच-सहा तरुणांनी काठ्या व तलवारीने मारहाण केली. म्हसणे-पारनेर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. जखमी वाळुंज याने सुपे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माजी उपसरपंचासह चाैघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
वाळुंज हा खासगी कंपनीत काम करून मोटारसायकलीवरुन घरी वडनेर हवेलीला जात होते. म्हसणे फाट्यावर त्यांनी अज्ञात व्यक्तीला लिफ्ट दिली. एक किलोमीटर पुढे जाताच मागून व पुढून स्कार्पिओ व कारमधील लोकांनी त्यांना गाठले. शिविगाळ करून हातातील काठ्या व तलवारीने जबर मारहाण करुन ते पळून गेले. 

आरोपींमध्ये माजी उपसरपंच राजीव दादाभाऊ सोनुळे, प्रताप भाऊसाहेब सोनुळे, बाळू गंगाराम सोनुळे, किरण भाऊसाहेब सोनुळे (चौघेही मूळ राहणार वडनेर हवेली, सध्या शिरूर) यांचा समावेश आहे. ही घटना राजकीय वैमनस्यातून झाल्याचे सौरभचे वडील साहेबराव वाळुंज यांनी सांगितले. सौरभ सध्या सुपे येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.