श्रीगोंदा तालुक्यातील जवान जम्‍मू काश्मीरमध्ये शहीद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील कपिल नामदेव गुंड ( वय-२६) हे ओडीसेक्‍टर ,कालापहाड, उधमपूर ( जम्मू काश्मीर ) येथे लष्करी सेवेत कर्तव्य बजावत असताना गुरूवार दि १५ रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आले. त्याच्यावर सोमवार दि १९ सकाळी अजनुज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
Loading...

याबाबत अधिक माहिती अशी, अजनुज येथे नामदेव गुंड यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. नामदेव गुंड हे लष्करी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले. थोरला मुलगा कपिल हा चार वर्षांपूर्वी लष्करी सेवेत दाखल झाला. थोरल्या मुलाने लष्करी सेवेत जाऊन आपली परंपरा चालवावी अशी वडिलांची इच्छा होती ती इच्छा कपिलने पूर्ण केली. कपिलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 


नामदेव गुंड यांचा धाकटा मुलगा पोलिस सेवेत कर्तव्य बजावत आहे. गुरुवारी (१५) नेहमीप्रमाणे उधमपूर येथे कपिल आणि त्याचा सहकारी हे रात्रीच्या सुमारास कर्तव्य बजावत होत. त्याच दरम्यान मोठा स्फोट झाल्याने कपिल आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले. दोघांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र कपिल हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असल्याने त्याला वीरमरण आले. 


कपिलचे शव जम्मू काश्मीर येथून विमानाने पुण्यापर्यत आणले जाणार असून, तिथून लष्करी वाहनातून ते अजनुज येथे आणले जाणार आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता भीमा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.