अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना १० वर्ष कारावास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अकोले तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या भरत दुटे व सागर साबळे या दोघा आरोपींना संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. याप्रकरणी दुटे यास १० वर्षे कारावास तर दुसरा आरोपी साबळे यास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


Loading...
या खटल्याची हकीकत अशी, की दि. ११ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता भरत काळु दुटे (२१, रा. शेलविरे, ता. अकोले) व सागर अशोक साबळे (२४, रा. पाडोशी, ता. अकोले) यांनी अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर बसवून पाडोशी गावाजवळ जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच दुसऱ्या दिवशी दि. १२ डिसेंबर २०१६ रोजी दोघांनी मिळून दुटे याच्या मामाच्या शेतात पीडितेवर अत्याचार केला. 

घडलेला प्रकार कुणाला सांगितला, तर ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक आर. जी. बर्डे यांनी चार्जशिट दाखल केल्यावर संगमनेर न्यायालयात खटला सुरू झाला. 

या खटल्यास सरकारी वकील एन. पी. गवते, एस. ए. वाकचौरे यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार पी. एच. खोसे, सहाय्यक फौजदार एस. एम. इनामदार, सहाय्यक फौजदार सिकंदर शेख यांनी मदत केली. सरकारी वकील गवते व वाकचौरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संगमनेर न्यायालयाने भरत दुटे यास दहा वर्षे सश्रम कारावास व भा.दं.वि. कलम ३६३ मध्ये दोषी धरून पाच वर्षे कारावास तर सागर साबळे यास भा.दं.वि. कलम ३६३ मध्ये दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावास सुनावण्यात आला.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.