तीन गावांत झालेल्या मारामारीत १५ जण जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर व ब्राह्मणी येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ मारामारीत तब्बल पंधरा जण गंभीर जखमी झाले. अनेक मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. जखमींना ग्रामीण रूग्णालय व खासगी रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. 
Loading...

पहिली घटना राहुरी फॅक्टरी येथील पेट्रोलपंपाजवळ गुरूवारी रात्री घडली. मागील भांडणाच्या कारणावरून वादाला तोंड फुटून राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील तरूणांच्या दोन गटांत मारामारी झाली. यात तिघेजण जखमी झाले. 

दुसरी घटना ब्राह्मणी येथे शुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान घडली. जमिनीच्या वादातून दोन गटांतील तरूण समोरासमोर आले. या मारामारीत ९ ते १० मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. श्रीकांत नालकर, सोमनाथ भागवत (दोघे राहणार देवळाली प्रवरा), राजू गायकवाड (उंबरे), जाकिर पठाण (करजगाव) हे जखमी झाले. दासू पठारे यास नगर येथील रूग्णालयात हलवण्यात आले आहे. 

तिसरी घटना शुक्रवारी सकाळी बारागाव नांदूर येथील दावल मलिक दर्गा असलेल्या बनात वादातून घडली. दोन गटांत मारामारी होऊन बाबूभाई गुलाब इनामदार व रफिक उस्मान इनामदार यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. तिन्ही गावांमध्ये झालेल्या मारामारीत लाकडी दांडके, गज व काठ्यांचा वापर करण्यात आला. 

परस्परविरोधी फिर्यादी देण्यासाठी तिन्ही गावांतील मोठा जमाव दुपारी राहुरी पोलिस ठाण्यात जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. राहुरी फॅक्टरी येथील घटनेबाबत विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.