विजेच्या तारा तुटल्याने ३० एकर ऊस जळून खाक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे वीजविरतरण कंपनीच्या या तारा तुटुन लागलेल्या आगीत बारा शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस ते तीस एकर उस जळाला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे लोळ आकाशात झेपावत असताना शेतकरी मात्र काहीही करु शकले नाहीत. 
Loading...

वडगाव येथे एकनाथ बडे, विष्णु पांगरे,आश्रु पांगरे, रावसाहेब पांगरे, भाऊसाहेब पांगरे, बाबूलाल शेख, घनश्याम पांगरे, अमिन शेख, भास्कर पांगरे, महंमद शेख आसराबाई पांगरे या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज वितरण कंपनीच्या खांबावरील विजेच्या तारा तुटल्या. 

त्यामुळे उसाच्या शेताला आग लागली. आगीचा वेग इतका होता की संबधित शेतकरी काहीच करु शकले नाहीत. जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने व आगीचा वेग जास्त असल्याने संपूर्ण उसाचे पीक काही वेळातच जळाले. जळालेला उस वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने खास बाब म्हणून तातडीने तोडुन घेवुन जावा अशी मागणी वडगावचे माजी सरपंच आदिनाथ बडे यांनी केली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.