श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना मिठाईच्या बॉक्समध्ये धूळ भेट !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्ता असणारा जामखेड श्रीगोंदा काष्टी रोड वर धुळीचे साम्राज्य कमी करून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, यासाठी संभाजी ब्रिगेडकडून मागील पंधरा दिवसापूर्वी श्रीगोंदा नगरपरिषदेला आंदोलनाचे पत्र दिले होते तसेच मास्क वाटप आंदोलन करण्यात आले होते, मात्र तरीही पालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल न घेतल्यामुळे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रमुख रस्ता जामखेड श्रीगोंदा काष्टी रोड वर सर्व व्यवसायिकांकडून फुफाटा गोळा केला व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांना हा फुफाटा भेट देण्यात आला, व संभाजी ब्रिगेडकडून मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर फुपाट्याने रांगोळी काढून अनोख्या प्रकारचा निषेध नोंदवण्यात आला. 
Loading...

मागील अनेक दिवसांपासून श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्ता जामखेड श्रीगोंदा काष्टी रस्त्याचे काम अतिशय संथ वेगाने चालू आहे, त्यामुळे या रस्त्यावरील सर्वच व्यवसाय करणाऱ्यांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे ठेकेदार वाबळे यांच्याकडून पालिकेच्या परस्पर ठेकेदार धावडे यांना काम देण्यात आले मुख्याधिकारी दातीर यांनी ठेकेदार वाबळे यांना संपर्क केला असता श्री धावडे यांना काम दिले असून या पुढील  कामे ते करतील व मला त्यातील काही माहित नाही अशी उडवाउडवीची उत्तरे ठेकेदार वाबळे यांनी मुख्याधिकारी यांना दिली.


त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले व आम्हाला लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अन्यथा बेमुदत आंदोलन चालू ठेवू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिला.तसेच श्रीगोंदा नगरपालिकेने जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असून ही धूळ कमी करा अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये धूळफेक करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिलीप लबडे यांनी दिला, त्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी 15 दिवसाच्या आत जामखेड श्रीगोंदा काष्टी रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन संभाजी ब्रिगेडला दिले व तसे न झाल्यास ठेकेदार वाबळे यांना ब्लॉक लिस्ट मध्ये टाकू असे लेखी पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.


संभाजी ब्रिगेडने फुफाट्याची रांगोळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर काढल्यामुळे व मिठाईच्या बॉक्समध्ये सर्व फुफाटा मुख्याधिकारी दातीर यांना भेट दिल्यामुळे आज श्रीगोंदा शहरांमध्ये या अनोख्या आंदोलनाची चर्चा होती. तसेच पालिकेने १५ दिवसाच्या आत काम पूर्ण न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे आणि  कार्याध्यक्ष इंजी.शाम जरे यांनी दिला.

यावेळी संदीप साळवे,नीलेश साळवे ,संभाजी लबड़े,संतोष सप्रे, संजय हिंगसे, अक्षय सप्रे,शाहरुख शेख,मचिंद्र लांडे, कुमार सप्रे,अमोल शेळके, सुहास गाड़ेकर, युवराज पळसकर, प्रदीप ढवळे, अक्षय ढ्वळे,सुनील रोही, ह.भ.प. होरे माऊली, बंडू लबड़े , गणेश पारे , संग्राम घोडके, देव हिरडे,भाऊसाहेब दांडेकर , संतोष कोथिम्बीरे , भैया उदमले, ई नागरिक उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.