मनपा निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले कोणाचे ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रदेश पातळीवरून कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये आमदार शिवाजी कर्डिले नसले, तरी महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Loading...


शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजी, तसेच निवडणुकीच्या काळात वाढणारी डोकेदुखी या सर्व बाबी लक्षात घेऊन आमदार शिवाजी कर्डिले यांनी मला माझ्या मतदारसंघात फिरण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने ते भाजपच्या कोअर कमिटीत नाहीत.

पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार सुजित सिंग ठाकूर जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी व सरचिटणीस किशोर बोरा यांचा कोअर कमिटीमध्ये समावेश आहे. या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांची ही महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे भाजपसह अन्य पक्षांचे लक्ष लागलेे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.