मराठा समाजाचा अंत पाहू नका,आंदोलन तीव्र करू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शांततेच्या व शिस्तीच्या मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या. मात्र आजपर्यंत समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव भोर यांनी जामखेड येथे रथयात्रेच्या स्वागत प्रसंगी दिला. 


Loading...
सकल मराठा समाज्याच्या आरक्षणा बरोबरच विविध प्रश्नांसंबंधित मराठा संवाद रथयात्रेचे स्वागत जामखेड येथील सकल मराठाच्या वतीने शुक्रवारी रात्री शहरातील खर्डा चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय 'मराठा संवाद यात्रा' १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर आयोजित केली आहे. या

त्रेच्या स्वागत प्रसंगी सकल मराठा समाजाचे मंगेश आजबे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम निकम, कुंडल राळेभात, पांडुरंग भोसले, धनंजय भोसले, केशव कोल्हे, सरपंच काकासाहेब चव्हाण, संतोष भोंडवे, सोमनाथ तनपुरे, संजय बेरड, तात्याराम पोकळे, शरद कार्ले, माजी सरपंच हवा सरनोबत, गजानन बेद्रे, नितीन टेकाळे, भरत पवार, गणेश पवार, जालिंदर चव्हाण उपस्थित होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.