राहुरी तालुक्यात सिनेस्टाईलने हाणामाऱ्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन गटात सिनेस्टाईल हाणामाऱ्या होऊन मोठी धुमश्चक्री झाली. या वादात तलवार, काठी, गज यांचा वापर झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...

काल शुक्रवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाऴी ९ वाजेच्या सुमारास ब्राम्हणी गावातील एसटी स्टॅँडवर उस्मानभाई शेख यांच्या ब्राम्हणी गावातील गाळयासमोरील मशिदीशेजारी असलेल्या बांगडयाच्या दुकानात फिर्यादी इस्माईल शेख व त्यांचा चुलत भाऊ आलिम यांना वरील आरोपींनी तलवार, लोखंडी पात्याचे धारधार हत्यार, लोखंडी पाईपला चेन सॉकेट असलेली हत्यारे व लाकडी दांडे तसेच लथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच दुकानातील ३५०० रुपये चिल्लर, फिर्यादीची मामी शम्मा शेख हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तसेच साक्षीदार नजमा शेख यांच्या गळयातील पानपोत बळजबरीने काढुन घेऊन यातील फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन दुकानातील बांगड्या व इतर सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली. 

ब्राम्हणी येथील मिस्तरी काम करणारे इस्माईल शफीक शेख यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२६/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ३२४, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ४५२ तसेच आर्मॲक्ट ४/२५, मुं पो ॲक्ट १९५१चे कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे जाकिर आलम पठाण, शायद हसन पठाण, आलम हसन पठाण, हसन कोंढाजी पठाण, चाँद अब्दुल पठाण, दादा चाँद पठाण, अब्दुलगणी पठाण, नुरा अब्दुलगणी पठाण, रविंद्र बाबासाहेब कणगरे, राजु मच्छद्रिं गायकवाड, तुकाराम भिमराज पटारे, निलेश साहेबराव झावरे, रामदास ऊर्फ लाव्या धनवटे, श्रीकांत विजय नालकर, सोमनाथ भिमराज भागवत व इतर ५ ते १० अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.