निकाल विराेधात गेल्याने जिल्हाधिकाऱ्यास महिलेकडून मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जालना जिल्ह्यात जमिनीच्या प्रकरणातील निकाल अापल्या विराेधात गेल्यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने शुक्रवारी चक्क अपर जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली. या अधिकाऱ्याने अापल्याला पैशाची मागणी केल्याचा अाराेप करत या महिलेने त्यांच्याविराेधात पाेलिसात तक्रारही दाखल केली.

Loading...
अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले हे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अाले असता तिथे अालेल्या एका महिलेने अडवून त्यांच्या पाठीवर चापट मारली. त्यावर खपले यांनीही तिच्याविराेधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाेलिसात फिर्याद दिली असून गुन्हाही दाखल झाला अाहे.

या महिलेची जाफराबाद येथील जमिनीशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी खपले यांच्याकडे सुरू आहे. शुक्रवारी ही महिला खपले यांच्या दालनात आली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनाकडे खपले जात असताना या महिलेने रस्ता अडवून त्यांच्या पाठीत चापट मारली. ;दरम्यान, खपले यांनी अापल्याकडून ५० हजार रुपये घेऊनही अापल्याविराेधात निकाल दिला, अशी तक्रार महिलेने पाेलिसांत दाखल केली अाहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या पतीनेच जमिनीची विक्री केली होती. त्यामुळे तिच्या दाव्यात तथ्य नाही. निकाल विराेधात गेल्याने ही महिला अापल्यावर अाराेप करत असून त्यात काहीही खरे नाही, असे खपले यांनी स्पष्ट केले.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.