केडगावचे सर्वपक्षीय नाराज इच्छुक एकत्र येवून निवडणूक लढविणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावललेले केडगावमधील सर्वपक्षीय इच्छुक कार्यकर्ते एकत्र आले असून केडगाव विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे यांनी दिली. 

Loading...
ही विकास आघाडी केडगावमधील प्रभाग 16 आणि 17 मध्ये 8 उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाकडून नकार मिळाल्याने केडगाव विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. 

या आघाडीत केडगाव मधील सर्वपक्षीय नाराज कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यात आले असून त्यात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील नाराज कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रभाग 16 व 17 मध्ये उमेदवार उभे करून निवडणूकीला सामोरे जाणार आहे. उमेदवारांची नावे सध्या गोपनिय ठेवण्यात आली आहे. 

योग्य वेळी सर्व उमेदवारांची नावे जाहिर करण्यात येतील असे भिंगारदिवे यांनी सांगितले. दरम्यान केडगावमध्ये शिवसेना, भाजप स्वबळावर लढत असून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून निडवणूकीला सामोरे जात आहेत. आता त्यात विकास आघाडीची भर पडली असल्याने केडगावमध्ये रंगतदार लढती पहायला मिळणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.