आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकारात बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय मुलींची नृत्य कार्यक्रमांच्या नावाखाली फसवणूक करून त्यांना परदेशात वेश्यालयांमध्ये विकणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका अॅग्नेस हॅमिलटन(५६) हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने नृत्यदिग्दर्शनही केलं आहे. 

Loading...
अॅग्नेसस हॅमिल्टन अंधेरी जवळच्या लोखंडवाला परिसरात राहत असून इथेच नृत्याचे वर्गही घेत होती. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत अॅग्नेसचे संबंध होते. पण गेल्या काही वर्षांपासून हॅमिल्टनकडे नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींची बहारीन, केनिया किंवा नैरोबीमधील वेश्यालयांमध्ये विक्री करत होती. एका मुलीमागे ४०,००० रुपये कमवत होती. नुकतीच एक गरीब मुलगी तिच्याकडे नृत्य शिकायला आली होती. 

या मुलीला नृत्याच्या कार्यक्रमासाठी अॅग्नसने केनियाला पाठवले. केनियात रझिया पटेल नावाच्या महिलेशी तिची भेट झाली. रझिया पटेलने तिला केनियातून नैरोबीत नेले. तिथे तिच्याकडून रझिया पटेलने पासपोर्ट काढून घेतला. त्यानंतर नैरोबीच्या एका वेश्यालयात विकलं. ही मुलगी देहविक्रय करण्यास नकार देत होती. तेव्हा ड्रग्स विक्रीच्या खटल्यामध्ये अडकवण्याची धमकीही तिला देण्यात आली. 

काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. या हॉटेलवर नैरोबी पोलिसांची धाड पडली. तेव्हा या पीडित मुलीने आपली व्यथा नैरोबी पोलिसांना सांगितली. नैरोबी पोलिसांनी लगेच रझिया पटेलला अटक केली आणि तिच्याकडून पीडित मुलीाच पासपोर्ट मिळवला. पीडित मुलीची ओळख पटल्यानंतर तिला भारतात पाठवण्यात आलं. दरम्यान अपहरण आणि विक्री केल्याप्रकरणी अॅग्नेस हॅमिलटन हिला तिच्या राहत्या घरातून मुंबई पोलिसांनी अटक केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.