आमदार जगताप पितापुत्रांसह आ.शिवाजी कर्डिले,माजी आ.अनिल राठोड तडीपार होणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व तडीपार करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पोलिस स्टेशनकडून तडीपार करण्याच्या प्रस्तावाची यादी वाढत आहे. या यादीत आता आजी-माजी नगरसेवकांबरोबरच विद्यमान आमदार, माजी आमदारांची नावे आली आहेत.
Loading...

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, शिवसेनेचे माजी आमदार व उपनेते अनिल राठोड यांच्या तडीपारीचे प्रस्ताव शनिवारी प्रांतधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

केडगाव येथील महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोघांची झालेली हत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणामुळे पोलिस प्रशासनाने खमकी भूमिका घेत गंभीर गुन्हे असलेल्यांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. 


त्यात भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनने शनिवारी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप यांच्याविरुद्ध तडीपारीबाबचे प्रस्ताव प्रांतधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत. केडगाव हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याचे गुन्हे या दोघांविरुद्ध आहेत. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असून, हा गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे. या व्यतिरिक्त दोघांविरुद्ध इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

कोतवाली पोलिस स्टेशनने आमदार संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्या तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. संग्राम जगताप यांच्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे आहेत. तर माजी अनिल राठोड यांच्याविरुद्ध केडगाव हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर हल्ला करून दंगल केल्याचा गुन्हा व इतर अकरा प्रलंबित गुन्हे असल्याचे तडीपारीच्या प्रस्तावात म्हटले आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.