नोकरीत बदली झाल्याच्या रागातून मनपा कर्मचाऱ्यास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नोकरीत बदली झाल्याच्या रागातून पितापुत्राने एकास लोखंडी साखळी व पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना सिद्धार्थनगर येथील करंदीकर हॉस्पिटल समोर घडली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिद्धार्थ नगर येथील बाळू जगन्नाथ विधाते हे करंदीकर हॉस्पिटल समोर उभे असताना दुपारी गुलाब राजाराम गाडे व त्यांचा मुलगा यांनी येऊन विधाते यांना दमदाटी केली, तुझ्यामुळे माझी बदली झाली आहे असे म्हणून शिवीगाळ करून बुलेटच्या साखळीने व लोखंडी पाईपने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत विधाते यांचा मोबाईल गहाळ झाला. याबाबत तोफखाना पोलिसांनी गुलाब गाडे व त्यांच्या मुलाविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.