बुर्‍हाणनगर देवी मंदिरातून चांदीचा मुकूट व दागिन्यांसह 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नगर शहराजवळील बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरातून चोरट्यांनी आज (शनिवार) पहाटे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मंदिरातील देवीचा चांदीचा मुकूट, छत्री, सिंह या दागिन्यांसह दानपेटीतील रोख रक्कम चोरी झाली आहे. 
Loading...

चोरट्यांनी मंदिरांनाही सावज करत जिल्हा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आगडगाव (ता. नगर) येथील जागृत भैरवनाथ मंदिरातील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापि यश मिळालेले नाही. त्यातच बुर्‍हाणनगरचे देवी मंदिरही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज (शनिवार) पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास 5 तरुण चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व जाळ्या कटरने कापून मंदिरात प्रवेश केला. देवीचा मुकूट, छत्री, सिंह या चांदीच्या दागीन्यांसह दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 4 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. 

सकाळी पुजारी विजय भगत हे आल्यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत भगत यांनी तातडीने पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच तरुणांनी ही चोरी केल्याचे दिसत आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.