शस्त्राचा धाक दाखवून पोलिसालाच लुटले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावमध्ये शस्त्राचा धाक दाखवून पोलिसालाच लुटण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता शहरात घडली. नगर-मनमाड रस्त्यावरील स्वस्तिक हॉटेलशेजारील पेट्रोल पंपासमोर चार अनोळखी व्यक्तींनी ही लूट केली. 
Loading...

पोलिस कॉन्स्टेबल रमाकांत यशवंत मुंडे (वय ३९, दिंडोरी रस्ता. म्हसरूळ, ता. जि. नाशिक) व चालक शंकर गुंजाळ तेथून जात असताना दोन मोटारसायकलींवर भामटे आले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून मंुडे यांच्याकडील दहा हजार दोनशे रूपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.