महापालिका निवडणुकीत नगरमध्ये घडणार परिवर्तन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीत अहमदनगरमध्ये परिवर्तन घडणार असून, दिल्लीच्या धर्तीवर आप व देशभक्त पार्टीच्या अहमदनगर सुधार आघाडीला बहुमत मिळणार असल्याची भावना आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.
Loading...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप व देशभक्त पार्टीची युती होऊन अहमदनगर सुधार आघाडीची निर्मिती करण्यात आली. दोन्ही पार्टीच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक ब्रिगेडियर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पटवर्धन चौक जवळ झाली यावेळी ते बोलत होते.


भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी डमाळे यांनी आप व देशभक्त पार्टी वैचारिक पातळीवर एकत्र आले असून, खर्‍या लोकशाहीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन शहराचा विकास करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी अहमदनगर सुधार आघाडीची निर्मिती केली असून, याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.