पतंगाच्या मांजामुळे मान कापली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील उमेश कानडे (४० वर्षे, रामपूरवाडी) यांची पतंगाच्या मांजामुळे  मान कापली. सुदैवाने मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी तुटली नाही, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 
Loading...


याबाबत सविस्तर माहिती अशी, कानडे हे मोटारसायकलीवरुन शिर्डीकडे जात होते. पुलावरुन जाताना मांजा त्यांच्या मानेत अडकला. काही समजण्याच्या आत मोठ्या प्रमाणात रक्त यायला सुरुवात झाली. त्यांनी नॅपकीन मानेजवळ दाबून धरत सहकाऱ्याच्या मदतीने पाटील रुग्णालय गाठले. मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी उघडी पडली होती. आणखी एक मिलीमीटर खोल जखम झाली असती, तर जीवावर बेतले असते. जखमेवर तातडीने टाके घालण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.