अहमदनगर सोलापूर महामार्गावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील अहमदनगर सोलापूर महामार्गावरील साकत येथे शुक्रवार दि.१६ रोजी सकाळी सीना नदी काठच्या परिसरातील साकत गावठाण हद्दीत एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळल्याने या भागात खळबळ उडाली.

Loading...
याबाबत सविस्तर असे की, साकत येथे नदीकाठच्या परिसरात गावठाण हद्दीत एका अंदाजे ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. येथील बाबासाहेब चितळकर यांनी याबाबत नगर तालुका पोलिसांना खबर दिली.

साकत शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या अंगावर केवळ अंतवस्त्रे व गळ्यात लाल धागा असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला. सदरच्या मृतदेहाचे पोलिसांनी शवविच्छेदन केले असता संबंधित तरूणचा मृत्यू हा घातपात नसून दूर्धर आजाराने झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. तसेच मृत व्यक्ती ही महाराष्ट्रातील नसल्याचे तीच्या वर्णनावरून वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.