पोलीस उपनिरीक्षकाचा कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नवी मुंबईतील गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकानं कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अमित शेलार असं या पोलिसाचं नाव असून, तो सीबीडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 

या प्रकरणी पीडितेनं शेलारविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांचे एकांतातील व्हिडिओ दाखवून तो लैंगिक शोषण करायचा, असा आरोप तिनं तक्रारीत केला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी शेलारविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. 'पीडित महिला आणि तिच्या पतीनं शेलारविरोधात तक्रार नोंदवली आहे. 
Loading...

त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश सीबीडी पोलिसांना दिले,' अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. पोलिसांचं पथक शेलारच्या कामोठे येथील घरी गेले. मात्र, तो फरार झाला, अशी माहिती सीबीडी पोलिसांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.