छिंदमचा अर्ज घेणाऱ्या अधिकाऱ्याला काळे फासणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज घेणाऱ्या अधिकाऱ्याला काळे फासण्याचा इशारा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करून लोकसेवकाला धाक दाखविल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश अशोक राऊत (रा.लाटे गल्ली) असे आरोपीचे नाव आहे. 
Loading...

याप्रकरणी सहा. निवडणूक अधिकारी शहाजहान तडवी यांनी फिर्याद दिली आहे.. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा जो कोणी अधिकारी उमेदवारी अर्ज स्विकारले, त्या अधिकाऱ्याला मी काळे फासणार. माझे नाव भावेश राऊत, मी स्वत: त्या अधिकाऱ्याला घरी किंवा ऑफिसमध्ये जाऊन काळे फासणार आहे. तसेच जे कोणी सुचक-अनुमोदक असतील त्यांचे नाव जाहीर करावे. त्यांचा मोठा बोर्ड त्याच्या वार्डत लावतो.

असा आशय असलेला व्हिडिओ व्हायरल करून श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचे निवासस्थानी अगर शासकीय कार्यालयात जाऊन काळे फासण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.