एअरटेलची धमाका ऑफर ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेटा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- टेलिकॉम क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असलेल्या एअरटेलने ग्राहकांसाठी नवा प्रीपेड प्लान आणला आहे. ४१९ रुपयांच्या या नव्या प्लॉननुसार ग्राहकांना दररोज १.४ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता ७५ दिवसांची असणार आहे. एअरटेलच्या या नव्या ४१९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला दररोज १.४ जीबी डेटासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. 
Loading...

एअरटेलचा ग्राहक ज्या भागात राहतो, तेथे ४जी सुविधा नसल्यास ३जी किंवा २जी नेटवर्कवरही या प्लानचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, १९९, ३९९, ४४८ आणि ५०९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्येदेखील दररोज १.४ जीबी डेटा मिळतो. तर दुसरीकडे, एअरटेलने आपल्या टॅरिफ प्लानमध्ये बदल केले आहेत. त्याप्रमाणे आता ५४९ आणि ७९९ रुपयांचे प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध नसतील.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.