कॉंग्रेसच्या भूमिकेमुळे आघाडी विस्कटणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनपा निवडणुकीची राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांच्यावर तर काँग्रेसकडून डॉ.सुजय विखे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी सर्वच प्रक्रियेत अग्रेसर असताना काँग्रेसकडून मात्र हालहाली कमी आहेत. विशेष म्हणजे याबाबत काँग्रेसचे सुजय विखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नसल्याची माहिती मिळाली आहे.
Loading...

नगर काँग्रेसच्या अस्पष्ट भुमीकेमुळे काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीतील इच्छुकांची यादी ही लांबणीवर पडली असून, दोन्ही पक्षांमधील इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला निरोप मिळत नसल्यामुळे दोन्ही पक्षांपुढे आता काय करायचे असा पेच पडला आहे. 

दरम्यान काँग्रेसकडून डॉ. सुजय विखे यांच्यावर पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नगर जिल्ह्यातील असलेले राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दांडी मारली होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.