पिचड साहेब लवकर बरे व्हा ! छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज आवर्जून लिलावती हॉस्पिटल येथे भेट दिली.
Loading...
तेंव्हा ‘गेट वेल सून’ असा सल्ला देत छगन भुजबळ यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोघेही फिट होऊया, असा मनोदय व्यक्त केला.

आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पिचड झारखंड येथे गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आ. हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे व इतर नेत्यांनी पिचड यांची काल भेट घेतली होती. लवकर बरे व्हावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज भुजबळ यांनी लीलावती रुग्णालयात पिचड यांची भेट घेतली. माजी खासदार समीर भुजबळ यावेळी आवर्जून उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.