श्रीगोंदा महिला प्रवाशाचा ५५ हजारांचा मुद्देमाल चोरीस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील स्नेहल सुधीर बोडखे या गुरूवार दि.१५रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंद्यातून एसटीने कोळगावला माहेरी जात होत्या.
Loading...
श्रीगोंदा ते कोळगाव या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील पर्सची चोरी होऊन त्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण ५४,५०० रुपयांचा मुद्देमालासह एटीएम कार्ड, पॅनकार्ड व ड्राइव्हींग लाईसन चोरीला गेले आहे. याबाबत स्नेहल बोडखे यांचे पती सुधीर बोडखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.