राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वांबोरी चारीचे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व आमदार शिवाजी कर्डिले यांचा पुतळा जाळत निषेधाच्या घोषणा दिल्या.
Loading...

याबाबत अधिक माहिती अशी की, 'वांबोरी चारीचे आवर्तन सध्या सुरू असून काही गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये नाराजी आहे. या विषयावर तिसगाव मिरी गटाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे व पंचायत समितीच्या सदस्या गगुंबाई आटकर काहीच करीत नाहीत, असा आरोप करीत सातवड ग्रामस्थांनी या दोघांचा पुतळा जाळला.

त्यानंतर कराळे यांनी शुक्रवारी सातवड येथे येत आंदोलकांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. या वेळी कराळे यांनी आमदार कर्डिले यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. या वेळी बोलताना कराळे म्हणाले की, 'कर्डिले म्हणतात वांबोरी चारी आणायला मी होतो, त्यांचा काय संबंध आहे. ज्यावेळी चारी मंजूर झाली. त्या वेळी कर्डिले तिकडे दूध काढीत होते. त्यांच्या नऊ वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत धरणातील पाण्यात असलेल्या चारीचा फुटबॉल इंचभर सुद्धा खोल करता आला नाही.

जनता दुधखुळी नाही. प्रस्तापितांच्या विरोधात संघर्ष म्हणता, पण खरे प्रस्थापित तुम्ही आहात. जावई, मुली, सोयरे सगळे सगळे वर्षोनवर्षे सत्तेत आहेत. कर्डिले स्वतः अनेक वर्ष आमदारकीला चिटकून आहेत. तरीही तुम्ही विस्तापित कसे? कर्डिले यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंदोलकांशी संवाद साधू दिला नाही. 


पाण्याचे खोटे पूजन करून गावोगावी मिरवत बसले. आमचे पुतळे जाळल्याने दुःख होत नाही. पण प्रश्न सुटणार असेल तर पुतळा जाळा मला आनंदच होईल. डोळे वटारून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. स्वतःचे पुढारपण मिरवण्यासाठी तुम्हीच या प्रश्नाचे भांडवल करता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.