जगताप, गांधी,राठोड,कोतकर,कदम सह आजी-माजी नगरसेवक तडीपारीच्या वाटेवर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येत आहेत. 

Loading...

यासंदर्भात काही दिवसापूर्वीच आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनपा हद्दीतील संदेहास्पद व्यक्तींविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले होते. 

या अनुषंगानेच नगर उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे नगर शहर हद्दीतील पोलीस ठाण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालाच्या संदर्भात अभ्यास करून पहिल्या टप्प्यात नगर शहर परिसरातील काहीना आपणास हद्दपार करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटीस नगर प्रांत गाडेकर यांनी बजावल्या आहेत. संबंधित व्यक्तींना याबाबत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली असून शुक्रवार दि.१६ पासून पुढील ३ दिवस कार्यालयात समक्ष उपस्थित राहून म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास बजावण्यात आले आहे.


Loading...
शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव व भाजपचे विद्यमान नगरसेवक सुवेंद्र गांधी, शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव नगरसेवक विक्रम राठोड या दोघांसह महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, भाजपचे नगरसेवक किशोर डागवाले, मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांच्यासह तब्बल १२१ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. या सर्वांना सुनावणीसाठी शनिवारी (१७ नोव्हेंबर) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महानगरपालिका निवडणुक कालावधीत अहमदनगर महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक शांततेस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या बाधा पोहचवुन जनतेच्या जिवीतास तसेच मालमत्तेस धोका निर्माण होण्याचा दाट संभव निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हास अहमदनगर महानगरपालिका निवडणुक - २०१८ चे अनुषंगाने दि.२० नोव्हेंबर ते दि.१० डिसेंबर या कालावधी पावेतो अहमदनगर महानगरपालिका हद्दीत प्रवेशास व वास्तव्यास निर्बंध का लादण्यात येवू नये ? आशी विचारणा करणाऱ्या नोटिसा नगर प्रांत उज्वला गाडेकर यांनी १२१ जणांना बजावल्या आहेत .आणखी दोनशे जणांनाही याच आशयाच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निवडणूक काळात जवळपास ४०० ते ४५० जणांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नगर उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे नगर शहर हद्दीतील पोलिस स्टेशनकडून प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे.

या प्रस्तावांमध्ये नाव असणाऱ्यांची सर्वात प्रथम सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना तडीपार करायचे किंवा नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार सुनावणीला हजर राहण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

यांना मिळाली नोटीस 

नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचाही समावेश आहे. आतापर्यंत सुनावणीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या यादीत सुवेंद्र दिलीप गांधी, विक्रम अनिल राठोड, चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब मारुती बोराटे, आसाराम हरिभाऊ कावरे, गणेश कुंडलिक भोसले, शिवाजी अशोक कदम, नरेंद्र सचिदानंद कुलकर्णी, किशोर आसाराम डागवाले, अनिता विश्वनाथ दिघे, विशाल बबन हुच्चे, अभिजित शशिकांत वाघ, भाऊसाहेब देवीदास कोतकर, नंदू लक्ष्मण बोराटे, बंटी उर्फ कुणाल विष्णूपंत खैरे, अशोक शामराव दहिफळे, अनिल अशोक सातपुते, सागर सुभाष ठोंबरे, अफजल असिफ शेख, विशाल संजय वालकर, तेजस सतीश गुंदेचा, सचिन चंद्रशेखर शिंदे, अभिषेक कैलास भोसले, सचिन गणेश राऊत, प्रशांत बाळू गायकवाड, विठ्ठल नानाभाऊ सातपुते, हर्षवर्धन महादेव कोतकर, गजेंद्र नानाजी दांगट, विकास उर्फ विकीदादा जगताप, सागर नारायण राजगुरू, सुरेश किसन गायकवाड, शहा फैसल बुऱ्हाण सय्यद उर्फ शानु, गणेश केराप्पा हुचे, सुनील रामदास कोतकर, निखील बाळकृष्ण धंगेकर, घनश्याम दत्तात्रय बोडखे, मुद्दसर उर्फ मुद्या मन्सुर पठाण, ऋषीकेश महादेव कोतकर, बंटी उर्फ भावेश अशोक राऊत, परेश चंद्रकांत खराडे, मयुर शिवकुमार बोचुघोळ आदींसह अन्य नावांचा समावेश आहे.

Loading...

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.