पीकविम्याचा ६० हजार कोटींचा घोटाळा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पीकविम्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आले, मात्र शेतकऱ्यांना जमा झालेल्या रकमेच्या तुलनेत अर्धी रक्कमसुद्धा वाटप झाली नाही. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर देशात पीकविमा कंपन्यांत ६० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चिखली येथे पत्रकार परिषदेत केला.
Loading...

विखे पाटील हे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आले होते. चिखली येथे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे-पाटील म्हणाले, २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा उतरविला होता. 

हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा झाले, परंतु शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाटप करताना तोकडी रक्कम देण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विमा कंपन्यांना या दोन वर्षांत ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. विमा कंपन्यांचा फायदा करवून देण्यासाठीच सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ४ हजार कोटींचा घोळ करून शेतकऱ्यांचे पैसे शासनाने विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचे विखे-पाटील म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.