जिल्ह्याचे ठिकाण श्रीरामपूर करण्याची मागणी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याचे ठिकाण श्रीरामपूर करावे, अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

Loading...

याबाबत शिंगणापूर येथे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जवळपास चार दशकांपासून प्रलंबित असलेला अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती गेली चार वर्षे पाठपुरावा करत आहेत. परंतु हा विषय अद्यापही प्रलंबित आहे.

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्ह्याचे ठिकाण करावे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.