एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरहून पाथर्डी रोडने भरधाव वेगात जाणार्‍या एसटी बसने समोरुन येणार्‍या स्कुटी दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना बाराबाभळी शिवारात कवडे वस्ती समोर गुरुवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास घडली. 


Loading...
याबाबतची माहिती अशी की, भाऊसाहेब महादेव सानप (वय 36), गणेश पोपट पालवे (वय 25) (रा.बाळेवाडी, ता. नगर) हे दोघे त्यांची लाल रंगाची डिओ स्कुटी या दुचाकीवरुन बाळेवाडीकडून नगरकडे येत असता समोरुन भरधाव वेगात येणार्‍या एसटी बस (क्र.एमएच 14 बीटी 4386) वरील चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एसटी रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन समोरुन येणाार्‍या स्कुटीवर धडकली. 

या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यु झाला. स्कुटीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी रेवणनाथ महादेव सानप (रा.बाळेवाडी) यांच्या फिर्यादी वरुन भादंविक 304 (अ) 337, 279, 427, 338, मोटारवाहन कायदा कलम 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.